Share Market

शेअर बाजार म्हणजे काय? । What is Share Market

    आजच्या या लेखामध्ये आपण शेअर बाजार म्हणजे काय हे पाहणार आहोत. भारतात किती शेअर बाजार आहेत. भारतातील शेअर बाजार कोठे आहेत.  शेअर बाजारात कोण खरेदी विक्री करू शकतो. शेअरची खरेदी विक्री कशी करता येते. शेअर बाजाराची वेळ काय असते.
    
    शेअर बाजार म्हणजे काय? हे समजून घेत असताना याला आणखी काही नावाने ओळखतात का हे पाहणे गरजेचे आहे. शेअर बाजारला इंग्रजीमध्ये 'Share Market' शेअर मार्केट म्हणतात. मराठीमध्ये त्याला रोखे बाजार म्हणतात. त्यामुळे तुमच्या आता लक्षातच आले असेल की शेअर बाजार, शेअर मार्केट आणि रोखे बाजार हे एकच आहे.

    आपला सर्वांना बाजार म्हणजे काय हे माहीत आहे जेथे वस्तूंची व सेवांची खरेदी विक्री केल्या जाते त्या ठिकाणास बाजार म्हणतात ज्या बाजारात पुस्तकांची विक्री केली जाते त्यास 'पुस्तक बाजार' म्हणतात ज्या ठिकाणी सोने चांदीच्या दागिन्यांची खरेदी विक्री केल्या जाते त्यास 'सराफा बाजार' म्हणतात. ज्या ठिकाणी कापडाची खरेदी विक्री केल्या जाते त्याच 'कापड बाजार' म्हणतात. ज्या ठिकाणी कडधान्याची खरेदी विक्री केल्या जाते तसेच 'धान्य बाजार' म्हणतात. ज्या ठिकाणी प्राण्यांची विक्री केल्या जाते त्याच 'पशु बाजार किंवा ढोर बाजार' म्हणतात. ज्या ठिकाणी भाजीपाल्याची विक्री केल्या जाते त्यास 'भाजीबाजार' म्हणतात. ज्या बाजारात कंपनीच्या रोख्यांची किंवा समभागांची खरेदी विक्री केल्या जाते त्यास 'रोखे बाजार','शेअर बाजार', 'शेअर मार्केट' म्हणतात.
    
    तर आता आपल्या मनात विचार आला असेल की भारतात किती शेअर बाजार आहेत आणि कोठे आहेत. भारतात एकूण 25 ठिकाणी शेअर बाजार आहेत परंतु भारतातील सर्वात महत्त्वाचे दोनच रोखे बाजार आहेत. एनसी म्हणजे नॅशनल स्टॉक एक्स्चेंज  National Stock Exchange (NSE) आणि दुसरे म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज त्यास बीएसई म्हणतात Bombay Stock Exchange (BSE)  दोन्ही बाजार मुंबई येथे स्थित आहेत. याची माहिती आपण नंतर सविस्तर पाहणार आहोत.


प्रायमरी मार्केट। प्रथम बाजार
सेकंडरी मार्केट। द्वितीय बाजार


    रोखे बाजाराचे पुन्हा दोन भाग पडतात एक प्रार्थमिक रोखे बाजार आणि द्वितीय रोखे बाजार आता आपण प्राथमिक बाजार म्हणजे काय ते पाहू. कोणत्याही कंपनीचे शेअर बाजारामध्ये नोंदणी करण्यापूर्वी त्या कंपनीला आपला व्यवसाय वाढीसाठी जो निधी लागतो तो निधी कंपनी पब्लिकमधून जमा करते. ज्यावेळी कंपनी पब्लिकमधून पैसा जमा करते त्यावेळेस कंपनीचा आयपीओ Initial Public Offering (IPO) बाजारात आणला जातो आणि त्याच्या माध्यमातून फंड गोळा केला जातो त्यास प्राथमिक बाजार म्हणतात

सेकंडरी मार्केट। द्वितीय बाजार
    कंपनीचा आयपीओ बाजारात आणला आहे. ज्या लोकांनी आयपीओ घेतला आहे. ज्यांना त्या कंपनीचे शेअर मिळाले आहेत.  त्या कंपनीचे शेअर्स हे पब्लिकला खरेदी-विक्री करण्यासाठी उपलब्ध होतात त्यास द्वितीय बाजार किंवा सेकंडरी मार्केट म्हणतात.

बाजारा मधील सहभागी व्यक्ती
    चला तर आता आपण शेअर बाजारांमध्ये कोण खरेदी-विक्री करत असते आणि कोणत्या वेळात खरेदी विक्री होत असते ते पाहू बाजारामध्ये कोण शेअरची खरेदी आणि विक्री करत असते हे आपण या भागांमध्ये पाहणार आहोत. बाजारामध्ये रिटेल इन्वेस्टर. किरकोळ गुंतवणूकदार ज्या नागरिकांकडे पॅन कार्ड आहे असे कोणतेही नागरिक शेअर बाजारांमध्ये त्यांचे ट्रेडिंग अकाउंट डिमॅट अकाऊंट उघडू शकतात. शेअर ची खरेदी विक्री करू शकतात. त्याचप्रमाणे ट्रेडर, म्युच्युअल फंड, FII's फोरेन इंस्तिच्युशनल इन्वस्टर. DII'S डोमेस्टिक इंस्तिच्युशनल इन्वस्टर,FPI'S फोरेन पब्लिक इन्वेस्टर आदि शेअर बाजारात खरेदी विक्री करत असतात. त्याच प्रमाणे शेअर बाजारात लिस्टेड असलेल्या कंपन्यांना सुद्धा त्यांनी खुल्या बाजारात विकलेल्या शेअर्सची पुन्हा खरेदी करून घेत असतात त्यास बायबॅक म्हणतात. जेव्हा शेअरची संख्या जास्त असते किंवा मोठा व्यवहार असतो त्यावेळेस त्या व्यवहारात ब्लॉक डील आणि बल्क डील मध्ये होत असतो.
    शेअर बाजारात आपण आजही काही खरेदी किंवा विक्री करायची असते. ती आपल्याला प्रत्यक्षपणे संबंधित कंपनीकडे जाऊन करता येत नाही. उदाहरणार्थ समजा तुम्हाला कोलगेट कंपनीचे शेअर्स खरेदी करायचे आहेत. त्यासाठी तुम्ही कोलगेटच्या कंपनीकडे शेअर्स खरेदी करण्याला जाण्याची गरज नाही. हे काम तुम्ही तुमच्या घरून सुद्धा करू शकता. त्यासाठी सेबीकडे नोंदणीकृत एजंट असतात त्यांच्याकरवी आपण कोणत्याही कंपनीचे शेअर्सची खरेदी आणि विक्री करू शकतो. शेअर बाजारांमध्ये जे एजंट असतात त्यांना ब्रोकर म्हणतात ब्रोकर चे दोन भागात विभाजन केलेले आहे डिस्काउंट ब्रोकर आणि फुल-सर्वीस ब्रोकर

1 डिस्काउंट ब्रोकर
2 फुल-सर्वीस ब्रोकर

    डिस्काउंट ब्रोकर हे त्यांच्या ग्राहकाला अत्यंत कमी किमतीत म्हणजेच ब्रोकरेज वर शेअरची खरेदी-विक्री करू देतात. ते ग्राहकाला कोणत्याही टीप पुरवत नाही किंवा सल्ला देत नाही की अमुक कंपनीचे शेअर खरेदी करा किंवा तमुक कंपनीचे शेअर विक्री करा हे केवळ ग्राहकाला शेअर्स खरेदी आणि विक्री करण्यासाठी मोबाईल ॲप किंवा कम्प्युटरवर एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतात त्याच्या माध्यमातून ग्राहक शेअरची खरेदी विक्री करू शकतो. त्याचे दर प्रत्येक ऑर्डर प्रमाणे ठरवलेला असतो. तो फिक्स असतो. तुम्ही कितीही रुपयांचा सौदा घेतला तरी डिस्काउंट ब्रोकर तुम्हाला ठरवलेल्या फी पेक्षा जास्त ब्रोकरेज आकारत नाही. प्रत्येक डिस्काउंट ब्रोकरचे ब्रोकरेज हे ठरलेले असते. वीस रुपये, दहा रुपये कितीही रुपयांचा सौदा घेतला तरी तेवढेच पैसे देणे असतात. काही डिस्काउंट ब्रोकर हे इक्विटीला शेअर खरेदी करण्यासाठी कोणत्याही प्रकारची फीज आकारत नाही.

    फुल सर्विस ब्रोकर हे त्यांच्या ग्राहकाला फुल सपोर्ट करत असतात. त्यांच्याकडे तज्ञ लोकांची टीम असते. ते ग्राहकाला टिप्स प्रोव्हाइड करत असतात. त्यांचे ब्रोकरेज हे परसेंटेज प्रमाणे निर्धारित असते. ते ग्राहकाला लाईव्ह मार्केटमध्ये सपोर्ट करत असतात. त्यांच्याकडे मॅनपावर उपलब्ध असते. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या सिटीमध्ये ऑफिस किंवा ब्रांचेस असतात. ग्राहकाला कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण झाल्यास ग्राहक त्यांच्या नजीकच्या कार्यालयात जाऊ शकतो आणि स्वता:चे समाधान करून घेऊ शकतो त्या विरुद्ध डिस्काउंट ब्रोकरकडे एकच मध्यवर्ती कार्यालय असते आणि त्यांची सर्व कामे ही ऑनलाइन केली जात असतात.

    ग्राहकाने त्यांच्या गरजेनुसार ब्रोकरची निवड करावी ज्यांना जो ब्रोकर हवा आहे त्यांनी तो ब्रोकर निवडावा. आपण कितीही ब्रोकरकडे आपले अकाऊंट उघडू शकता. डिस्काउंट ब्रोकर आणि फुल सर्विस ब्रोकर हे सर्व ग्राहकांना डिमॅट अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट ओपन करून देत असतात. ज्याद्वारे शेअरची खरेदी आणि विक्री केल्या जाते. जेथे शेअरची खरेदी आणि विक्री केल्या जाते त्या अकाउंटला ट्रेडिंग अकाउंट म्हटल्या जाते. ट्रेडिंग अकाउंटमध्ये आपण वायदा बाजाराचे सौदे सुद्धा खरेदी-विक्री करू शकतो.  शेअर खरेदी केल्यानंतर ते तुमच्या डिमॅट अकाउंटला जमा होतात. ज्या शेअरची खरेदी केल्या जाते ते शेअर तुमच्या डीपीला जमा होत असतात. त्यालाच होल्डिंग म्हणतात.


मार्केटची वेळ

शेअर बाजार हा आठवड्यातून पाच दिवस चालू असतो. प्रत्येक शनिवारी आणि रविवारी बाजाराला सुट्टी असते. इक्विटी मार्केट सकाळी नऊ वाजता सुरू होते आणि दुपारी साडेतीन ला बंद होते. सकाळी नऊ वाजता सुरू झालेले मार्केटमध्ये  9.00 वाजता पासून ते 9.15 पर्यंत जे पंधरा मिनिटांचे सत्र असते त्या प्री मार्केट ओपनिंग म्हटल्या जाते. बँक निफ्टी ही नऊ दहा ला फ्री ओपन होते. सर्व व्यवहार के सव्वा नऊ वाजता पासून सुरू होतात आणि साडेतीनला बंद होतात. या व्यतिरिक्त ज्या दिवशी सण आणि उत्सव असतात त्या दिवशी बाजाराला सुट्या दिल्या असतात. सुट्टीच्या दिवशी बाजारामध्ये कोणत्याही प्रकारचे व्यवहार होत नाहीत.
    
    वरील सर्व लेखातून आपण शेअर बाजार म्हणजे काय ते पाहिले आहे. शेअर बाजारामध्ये कोण शेअरची खरेदी विक्री करू शकतो हे सुद्धा आपण वर पाहिले आहे. भारतामध्ये किती शेअरबाजारात आणि कोठे आहे ते सुद्धा आपण वरील लेखांमध्ये पाहिली आहे. त्याचप्रमाणे शेअर बाजाराची वेळ काय असते हे सुद्धा पाहिले आहे.त्याच प्रमाणे शेअर बाजारामध्ये असणाऱ्या ब्रोकरच्या प्रकाराची सुद्धा ओळख करून घेतलेली आहे. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर तुम्ही इतरांबरोबर शेअर करू शकता. शेअर बाजार मराठी मध्ये शिकण्यासाठी या ब्लॉगला बुक मार्क करू शकता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या