About Us

आमचे नाव

आम्ही कोण आहोत?

आम्ही काय करतो?

आम्ही कशासाठी करतो?

 

नमस्कार!
आमचे नाव वाचकहो तुमचे  At The Money (ATM) एटीएममध्ये स्वागत आहे. तुम्ही कोणत्याही एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले नसून तुम्ही  ॲट द मनी या वेबसाईटवर आले आहात या वेबसाईटवर तुमचे  सहर्ष स्वागत करतो. ॲट दी मनी या शब्दाचे लघुरूप आहे एटीएम. तुम्ही बँकेत जमा केलेली रक्कम तुम्हाला हवी तेव्हा एटीएमच्या माध्यमातून काढू शकता, विड्रॉल करू शकता. त्या एटीएम चे विस्तारित जे नाव आहे त्याला ऑटोमॅटिक टेलर मशीन असं म्हटले जाते.  त्याच प्रमाणे शेअर बाजारात सुद्धा एटीएम आहे आणि ते एटीएम केवळ आमच्याकडे आहे.


एटीएम ॲट द मनी ही एक शेअर बाजारातील संकल्पना आहे. तुम्ही शेअर बाजारात नवीन असल्यामुळे तुम्हाला याबद्दल फारशी माहिती नसेल, म्हणून तुम्हाला सध्या थोडक्यात माहिती देतो जेणेकरून तुम्हाला आमच्या बद्दल माहिती होईल शेअर बाजाराचे मुख्यतः दोन भाग पडतात एक प्राथमिक शेअर बाजार आणि दुसरा द्वितीय शेअर बाजार याद्वितीय शेअर बाजाराचे सुद्धा दोन भाग पडतात एक इक्विटी मार्केट आणि डेरिव्हेटीव्ह मार्केट याला मराठीमध्ये अनुक्रमे रोखे बाजार आणि वायदा बाजार म्हणतात.

     वायदा बाजारांमध्ये जे स्टॉक असतात किंवा जे इंडेक्स असतात त्या त्या इंडेक्सची किंवा स्टॉकची ऑप्शन चैन असते त्या ऑप्शन चैनच्या तक्त्यामध्ये स्ट्राईक प्राईज, ओपन इंटरेस्ट, व्हाल्युम, लास्ट ट्रेड  प्राईस, बीड कॉन्टिटी, बीड प्राईस, आस्क प्राईस, आदी सर्व माहिती  कॉल बाजू आणि पूट बाजू दोन्ही बाजूस दिलेली असते. At the money ATM are calls and put whose strike price is at or very near to the current market price of the underlying securities. त्या ऑप्शन चैन वरून आपल्याला At the money (ATM)एटीएम, Out the money (OTM)ओटीएम, In the money (ITM)आईटीएम अशाप्रकारे डाटा असतो. ज्या कंपनी  किंवा इंडेक्स कॉल बाजू आणि पूट बाजूच्या अगदी जवळची किंमत म्हणजे ॲट द मनी होय. एवढ्या वरूनच तुम्हाला आमच्या नावाची कल्पना आली असेल असे मी गृहीत धरतो.


आम्ही कोण आहोत

    आम्ही शेअर बाजारातील तज्ञ आहोत. त्याचप्रमाणे आमच्याकडे तज्ञ लोकांची टीम आहे. ही टीम एका उद्देशाने प्रेरित होऊन तयार झालेली आहे. आमचा जो उद्देश आहे तो भारतातील बहुसंख्य मूलनिवासी लोकांना शेअर बाजाराबद्दल प्रशिक्षण देणे हा आहे. ही एक स्टार्टअप आहे. मराठी लोकांना मरठी भाषेतून शेअर बाजारची माहिती करून देणे.



आम्ही काय करतो?

    आम्ही भारतातील बहुसंख्य मूलनिवासी लोकांना शेअर बाजारा बद्दल माहिती देणारे. त्यांना प्रशिक्षण देनार. त्यांना वेळोवेळी शेअर बाजारा बद्दल मार्गदर्शन करणार आहोत. टिप देणार आहोत. ज्यांना आर्थिक स्वायत्तता हवी आहे त्यांना शेअर बाजाराच्या माध्यमातून मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. लोकांना आर्थिक साक्षर करणे हे आमचे उदिस्ट आहे. आमची टीम ही विविध सामाजिक माध्यमांचा वापर करणार आहे जसे फेसबुक, युट्यूब, टेलिग्राम चैनल आणि व्हाट्सअप वेगवेगळ्या समाज माध्यमातून प्रशिक्षण देणार आहोत. या प्रशिक्षणा बद्दलचे व्हिडिओ तुम्ही युट्युबवर, फेसबुकवर पाहू शकता. त्याचप्रमाणे मराठी मधील शेअर मार्केटचे पीडीएफ बुक सुद्धा तयार केल्या जातील आणि ते वितरित केल्या जातील. ज्यांना शेअर मार्केटचे शिक्षणामध्ये रस आहे अशा लोकांपर्यंत हे पोहोचवल्या जातील.  ज्यांना आर्थिकदृष्ट्या स्वायतता हवी आहे त्यांच्यासाठी हे प्रशिक्षण राहणार आहे. यामध्ये गृहिनी, विद्यार्थी, वृद्ध पेन्शनर, सुशिक्षित बेरोजगार,पार्ट टाइम किंवा फुल टाइम काम करणारे लोक त्यांच्यासाठी हे प्रशिक्षण राहणार आहे.


आम्ही कशासाठी करतो?

    भारतातील शेअर बाजाराची सुरुवात अठराव्या शतकात झालेली आहे. त्याच प्रमाणे भारतात वेगवेगळ्या भागात वेगवेगळे शेअर बाजार अस्तित्वात होते परंतु मूलनिवासी लोकांना त्याबद्दल फारशी माहिती नाही. आता शेअर बाजार संगणीकृत आहेत. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात फोरेन इंस्टीटूशनल इन्वस्टर म्हणजेच की FII भारतामध्ये गुंतवणूक करतात. भारत ही एक खूप मोठी बाजारपेठ आहे. आपल्याला डेली रुटीनच्या लागणाऱ्या सर्व वस्तू आपण विविध कंपन्यांनी तयार केलेल्या असतात त्या खरेदी करतो. ते कंपनी आपल्याकडून त्याच्या मोबदल्यात मध्ये पैसा घेते. त्या कंपनीला झालेला जो नफा असतो तो नफा शेअर धारकामध्ये डिव्हिडनच्या रुपाने वितरित करण्यात येतो. जसजशी कंपनीची किंमत वाढत जाते तसतशी शेअर धारकाचे भांडवल वाढत जाते. या सर्व बाबींचा फायदा जे परकीय गुंतवणूकदार भारतामध्ये आहेत त्यांना होतो. येथील रहिवासी लोकांना याबद्दल माहिती नसल्यामुळे. ते यापासून अनभिज्ञ आहेत. त्यामुळे अशा लोकांना ज्ञात करून त्यांना आर्थिक फायदा किंवा स्वातंत्र्यप्राप्ती करून देणे हा आमचा एकमेव उद्देश आहे.


धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या