शेअर बाजाराविषयीचे समज-गैरसमज आणि वस्तुस्थिती

 शेअर बाजाराविषयीचे गैरसमज आणि वस्तुस्थिती

        मित्रांनो आपल्याला इंग्रजीची म्हण माहीतच असेल ‘हाफ नॉलेज इज डेंजरस थिंग‘ त्यामुळे कोणत्याही गोष्टीचे अर्धवट ज्ञान हे धोकादायक असते. ज्या गोष्टीचा आपण उपयोग करणार आहोत त्या बद्दलची माहिती जाणून घेवून भागत नाही. समजा तुम्हाला दुचाकी चालवायला शिकायची आहे. त्यासाठी तुम्ही नुसती माहिती घेऊन दुचाकी चालवायला घेणार नाही. गाडी सुरु कशी होते? गाडी बंद कशी करायची? गाडीचा वेग कसा वाढवायचा? गाडीचा वेग कमी कसा करायचा? अश्या अनेक प्रश्नाची उत्तरे माहित झाल्यावर ज्याला गाडी चालवता येते त्याला घेऊन त्याला शिकनाराच्या मागे बसवून नंतर शिक्षण घेतो. ज्याचे शिक्षण  घेणार आहोत त्याबद्दलची वस्तुस्थिती काय आहे. हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे असते. आपल्याला महाभारतातील उदाहरण माहीतच असेल अभीमन्यूला चक्रव्यूहात जायचं माहीत होते. परंतु चक्रव्यूहातून बाहेर येणे माहीत नव्हतं, त्यामुळे त्याचा घात झाला. 

    कोणत्याही गोष्टीची व्याप्ती लक्ष्यात घेत असताना ती एकांगाने नाही तर संपूर्ण माहिती घेणे गरजेचे असते.

six blind and Elephant
सहा आंधळे आणि हत्ती

तुम्हाला सहा आंधळे आणि हत्तीची कथा सांगतो. हत्ती कसा असतो. सहा आंधळे मित्र असतात ते हत्ती कसा आसतो हे जाणून घेण्याची त्यांच्यामध्ये जिज्ञासा निर्माण होते. जिज्ञासा निर्माण झाल्यामुळे ते सहा आंधळे प्राणी संग्रहालयमध्ये जातात आणि हत्तीला पाहण्याचा प्रयत्न करतात. जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. पहिल्याच्या हाती हत्तीचं पोट लागते. तो निष्कर्ष काढतो की हत्ती हा भिंतीसारखा ओबडधोबड आहे. दुसर्याच्या हाती हत्तीचे सुळे लागतात. दुसरा निष्कर्ष काढतो की हत्ती हा भाल्या सारखा टोकदार असतो. तिसर्याच्या हाती हत्तीचा पाय लागतो. तो निष्कर्ष काढतो की हत्ती हा खांबा सारखा सरळ असतो. चैथ्याच्या हाती हत्तीचे शेपूट लागते तो सांगतो हत्ती हा सापासारख असतो.पाचव्याच्या हाती हत्तीचे कान लागतात तो निष्कर्ष काढतो हत्ती हा सुपा सारखा आहे. सहाव्याच्या हाती हत्तीची सोंड लागते तो निष्कर्ष काढतो की लाकडाचा ओंडक्या प्रमाणे आहे. आपण सर्वांनी हत्त्ती पहिला आहे. त्यामुळे त्या सहा आंधळ्यापेक्षा हत्ती आपणास जास्त छान समजला आहे. पाण्यातील मासा झोप घेई कैसा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. त्याचप्रमाणे अर्धसत्य बर्याच जणांना माहित असते परंतु पूर्ण सत्य किंवा वास्तविक काय आहे हे फार कमी लोकांना माहिती असते. शेअर बाजारासंबंधी जे
समज-गैरसमज आणि वस्तुस्थिती ती आता आपण पाहणार आहोत.

१ शेअर बाजाराबद्दल लोकांमध्ये असा गैरसमज आहे की शेअर बाजार हा एक प्रकारचा जुगार आहे किंवा सट्टा आहे? 

वस्तुस्थिती  जो पर्यंत शेअर बाजारआणि सट्टा यामधील फरक लक्षात येत नाही तोपर्यंत लोक शेअर बाजाराला सट्टा समजतील. तर यामध्ये असणारे महत्त्वाचे फरक आहेत ते समजून घेणे गरजेचे आहे. शेअर बाजारांमध्ये कोणत्यातरी ब्रोकरकडे जाऊन आपल्याला एक खाते काढावे लागते. ते खाते काढण्यासाठी पॅन कार्ड, बँकेचे अकाउंट, आधार नंबर ब्रोकरकडे ऑनलाईन सबमिट करावा लागतो. किंवा ऑफलाईन तरी तुम्हाला ब्रोकरकडे नेवून द्यावा लागतो. त्याशिवाय शेअरची खरेदी विक्री करता येत नाही. जी अर्निंग आपण शेअर मार्केट मधून करतो त्यावर आपल्याला इन्कम टॅक्स द्यावा लागतो. याउलट जे सट्टा लावणारे लोक असतात. त्यांना कोठेही खाते काढण्याची गरज नाही. सट्टा बाजारातून कमावलेल्या रकमेवर कोणत्याही प्रकारचा टॅक्स भरावा लागत नाही. सगळे व्यवहार रोखीने होतात. शेअर बाजारात कोणताही व्यवहार रोखीने होत नाही.

    कोणत्याही प्रकारचा अभ्यास न करता जे लोकं शेअर बाजारामध्ये येतात त्यांचा हा अनुभव असतो. टीपच्या आधारे गुंतवणूक करणार्यांना हा अनुभव येतो. न्यूज चॅनल पाहून किंवा मित्रांनी सांगितलेल्या किंवा नातेवाइकांनी सांगितलेल्या स्टॉकमध्ये गुंतवणूक केल्यामुळे नुसकान होऊ शकते. कोणताही शेअर एकदा खरेदी केल्यानंतर तो आपल्याला विकावा लागतो. त्यामुळे शेअर खरेदी करण्यापूर्वी तो शेअर कितीला बाय करायचा कितीला सेल करायचा हा निर्णय अगोदर घ्यावा लागतो. मला वाटले शेअर वर जाईल म्हणून मी खरेदी केला. किंवा मला वाटले शेअर आणखी खाली जाईल म्हणून मी विकला. अशा प्रकारचे कारण देऊन शेअर मार्केटला सट्टा ठरवण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु ज्या वेळेस तुम्ही शेअर खरेदी करण्यापूर्वी त्या स्टॉकचे फंडामेंटल आणि टेक्निकल ऑनॅलिसिस करता येते. त्यामुळे जास्तीत जास्त फायदा होण्याचा चान्स अधिक असतो. 

२ शेअर बाजार हा केवळ पैसा वाल्यांचाच खेळ आहे. वरील प्रश्नामध्ये असे उपप्रश्न तयार होऊ शकतात. शेअर बाजारात पैसे वाल्यांसाठी आहे ? शेअर बाजार खेळ आहे? 

वस्तुस्थिती - खेळामध्ये एकल किंवा सांघिक असे प्रकार असतात एकल म्हटलं तरी प्रतिस्पर्धी खेळाडू पाहिजे असते. उदाहरणच द्यायचे झाल्यास चेस, कॅरम सांघिक खेळायचं उदाहरण द्यायचं झाल्यास. कबड्डी, क्रिकेट, खोखो त्याप्रमाणे शेअर मार्केट हा खेळ नाही त्यामुळे तुम्हाला कोणी प्रतिस्पर्धी नाही. तुम्ही तुमचे शहर कोणाला विकता हे कधीच समजत नाही.तुम्ही कोणाकडून शेअर खरेदी केले हे सुद्धा समजत नाही. शेअर बाजार हा खेळ नाही तर तो एक व्यवसाय आहे. शेअर बाजारात पैसेवाल्यांचा खेळ आहे? शेअर बाजार हा असा एक व्यवसाय आहे यामध्ये कितीही कमी रुपये घेऊन आल्यास तुम्हाला हा व्यवसाय करता येतो. शंभर रुपये, दोनशे रुपये मध्ये तुम्ही त्याची सुरुवात करू शकता. कारण की चांगले फंडामेंटल असलेले स्टॉक पन्नास रुपये शंभर रुपया पासून सुरु होणारे असतात. ज्यांना ही पैसे कमवायचे आहेत. त्यांनी या व्यवसायामध्ये येण्यास हरकत नाही. तुमच्याकडे असणारी शिल्लक रक्कम थोडी थोडी गुंतवणूक करून तुम्ही बाजारामधून तुमचे मोठमोठाले स्वप्नही साकार करू शकता. त्यासाठी तुम्हाला थोडी थोडी रक्कम गुंतवणूक करावी लागेल. जोखीम आणि परताव्याचा विचार करून जर व्यवस्थितपणे एसआयपी करत गेल्यास. खूप मोठी रक्कम यामधून कमावता येते. 

३ पैसाच पैसाला खेचतो म्हणजे त्याच्याकडे भरपूर पैसा आहे तोच शेअर मार्केट मधून चांगले रिटन कमवू शकतो?

वस्तुस्थिती - बाजारामध्ये गुंतवून ठेवलेल्या रकमेचे भाव हे नेहमी वाढत असतात. ज्यांनी ज्यांनी हजारांमध्ये गुंतवणूक केली त्यांची गुंतवणूक लाखांमध्ये जाते. ज्यांनी लाखामध्ये गुंतवणूक केली त्यांची गुंतवणूक कोटींमध्ये जाते. त्यामुळे तुमच्याकडे जेवढा पैसा आहे त्या पैशावर तुम्हाला मार्केट मधून वार्षिक 15 टक्के प्रमाणे कमीत कमी रिटर्न मिळू शकते. ही रक्कम केवळ सरळ व्याजाने वाढत नसून चक्रवाढ व्याजाने वाढते.

४ शेअर ब्रोकर हेच बाजाराचे तज्ञ असतात?

वस्तुस्थिती - शेअर ब्रोकरचे केवळ हे काम असते. आपल्या ग्राहकाला सेवा पुरवणे.शेअरची खरेदी आणि विक्री करण्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणे. एवढेच शेअरब्रोकर लोकांचे काम असते. परंतु आता बदलत्या युगामध्ये. ब्रोकरची स्पर्धा वाढलेली असल्यामुळे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ब्रोकर वेगवेगळे पर्याय वापरत असतात. फलु सविर्स ब्रोकरकडे कोणकोणते शेअर खरेदी करायचे किंवा कोणत्या शेअरमध्ये ट्रेडिंग करायची याच्या टीप देण्यासाठी आणि स्वतःचा धंदा वाढवण्यासाठी ब्रोकर टीप देण्याचे काम करत असतो. परंतु कोणताही ब्रोकर हा मार्केटचा तज्ञ असतोच असे नाही. काही ब्रोकर यासाठी अपवाद देखिल आहेत.

५ अॅडव्हायझरी कंपनीची सल्ला घेतल्याशिवाय पैसा कमावता येत नाही?

वस्तुस्थिती -अॅडव्हायझरी कंपनीने तुम्हाला सल्ला दिल्या पेक्षा त्यांनीच स्वत: शेअर बाजारातून नफा का कमवू नये. ज्याप्रमाणे आपली पाची बोटं सारखी नसतात त्याचप्रमाणे मार्केटमध्ये असणारे अॅडव्हायझरी ही सारखी नसते. जर काही लोकांना प्रॉफिट होतो त्यावेळेस काही लोकांना तोटा होत असतो. त्यामुळे खोटं सल्ला देऊन हे लोक आपले पैसे किंवा फिज वसुली करण्याचे काम करत असतात.

६ आतल्या बातम्यांवर आधारित गुंतवणूक फायदेशीर ठरते?

वस्तुस्थिती - बर्याच वेळा आतल्या बातम्या हेतुपुरस्सरपणे पसरवलेल्या असू शकतात तेव्हा एखाद्या आतल्या अशा बातम्यांवर विश्वास ठेवून कधीही गुंतवणूक करू नये. आतल्या म्हणविल्या जाणारया बातम्या सर्व  सामान्यपयर्तं पाहे ाचे पे यर्तं फार उशीर झालेला असतो. त्याचप्रमाणे व्हाट्सअप ग्रुप, टेलिग्राम चैनल किंवा युट्युब वरून पसरविल्या जाणाया बातम्या हेतुपुरस्सरपणे पसरविलेल्या असतात.

७ आयपीओ मध्ये गुंतवणूक करणे नेहमीच फायदेशीर ठरते?

वस्तुस्थिती - ज्यावेळेस कंपनीचा आयपीओ बाजारामध्ये लिस्ट होत असतो. त्यावेळेस बाजारामध्ये तेजीचे वातावरण असल्यास आयपीओ मध्ये चांगले रिटर्न मिळवता येते. त्यासाठी ती कंपनी फंडामेंटल स्ट्रॉंग असली पाहिजे आणि तिचा बिझनेस समोर भविष्यात वाढणारा असावा त्याच कंपनीच्या आयपीओला चांगली किंमत मिळते. अन्यथा आयपीओ  आणण्यामागे  कपंन्याच  किंवा प्रवर्तकाचा हेतू जास्तीत जास्त प्रीमियम पदरात पाडून घेणे हा असतो

८ शेअरबाजारातून पैसे कमावण्यासाठी सतत कम्प्युटर स्क्रीन समोर बसणे किंवा बिझनेस चॅनल बघणे आवश्यक असते

वस्तुस्थिती - सतत स्क्रीन पाहिल्यामुळे अल्पावधीतच शेअर खरेदी-विक्रीचा मोह होतो आणि चागंल्या चागंल्या कपं न्या हातनू सुटतात तसचे कपंन्याच्ं या आर्थिक कामगिरीकडे दुर्लक्ष होते. ज्या कंपनीमधे आपण गुंतवणूक केलेली असते. त्या कंपनीचे शेअर विकून टाकल्यानंतर वर जाण्यास लागतात त्यामुळे एकदा गुंतवणूक केल्यानंतर याही वेळेस मार्केटमध्ये स्वस्तामध्ये ते शेअर खरेदी करण्यासाठी पैसा राखून ठेवावा.

९ डे ट्रेडिंग किंवा इंट्राडे व्यवहार करून रोज कमाई करता येते?

वस्तुिस्थती - राजे च्या राजे खरेदी-विक्री करून सातत्याने पैसा  कमावणे  खपूच अवघड असते याउलट लॉसेस ब्रोकरेज व टॅक्सेस मुळे तुमचे भांडवल दिवसेंदिवस घटत जाण्याची शक्यता असते

१० वायदा बाजार हा झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग आहे?

वस्तुस्थिती - गुंतवणूक गुरु वॉरन बफेट आणि पीटर लिंच यांनी फ्युचर व ऑप्शनला फायनान्शियल वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन म्हणजेच मोठ्या प्रमाणावर नुसकान करणारी आर्थिक क्षेत्रे असे म्हटले आहे या व्यवहारात अल्पावधीत मोठे आर्थिक नुस्कान होण्याची शक्यता अधिक असते त्यामुळे छोट्या गुंतवणूकदारांनी या पासून लांबच राहणे सोयीस्कर ठरते. जर आपण यामध्ये नियमाने ट्रेडिंग आणि प्रॉपर टार्गेट आणि स्टॉप लॉसमध्ये ट्रेडिंग केली तर भरपूर पैसा कमावता येऊ शकतो

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या

  1. Slots Casino Site | Online Casino Gambling |
    With over 30 years of experience 카지노 in online casino 메리트 카지노 gaming, including the creation of Baccarat, Baccarat and Blackjack, Slots Casino delivers the best 바카라

    उत्तर द्याहटवा
  2. What are the chances of winning in 2021 slot machines? - Dr.MCD
    at casinos  Slot machines 인천광역 출장안마 are a good way 전주 출장마사지 to 안성 출장마사지 get used to playing real money gambling games. 경상북도 출장안마 This is why you should look for a real money online 창원 출장마사지 casino, the good.

    उत्तर द्याहटवा